नोंदणी करून हायड्रोसील शस्त्रक्रिया करा: डॉ. गोल्हर अंडकोषांना बाहेरून दोन थर असतात. ते द्रवाने भरलेले असतात. जर हे द्रव कोणत्याही कारणास्तव अंडकोषाबाहेर जमा झाले तर हायड्रोसील होऊ शकते. यामुळे अंडकोष मोठा होतो आणि तीव्र वेदना होतात. उपचार न केल्यास हायड्रोसीलमुळे गुंतागुंत होऊ शकते किंवा फाटू शकते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी सांगितले. तथापि, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी लोकांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये नोंदणी करण्याचे व शस्त्रकिया करण्याचे अवाहन केले आहे