राजकारणाच्या मैदानात आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांना चितपट करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा एक आगळावेगळा अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. भंडाऱ्याच्या लाखनी येथे आयोजित 'मेमन प्रीमिअर लीग' या क्रिकेट स्पर्धेला नाना पटोले यांनी भेट दिली. मात्र, केवळ पाहुणे म्हणून उपस्थित न राहता, खेळाप्रती असलेली आपली ओढ त्यांना रोखता आली नाही. त्यांनी थेट हातात बॅट पकडली आणि खेळपट्टीवर उतरून क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला.