जालना: जालना, अहिल्यानगर व पुणे येथील मोटारसायकल चोरी प्रकरण उघड;एक आरोपी जेरबंद, तीन दुचाकी जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जालना, अहिल्यानगर आणि पुणे येथून मोटारसायकल चोरी करणार्या एका सराईत चोरास स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून त्याच्याकडून तीन चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत. गुरुवार दि. 18 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. जिल्ह्यात वाढत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना विशेष सूचना दिल्या होत्या.