शहरातील मांडळ चौफुली परिसरात काही महिलांकडून सुरू असलेल्या कथित देहविक्रीच्या अवैध व्यवसायावर 6 डिसेंबर रोजी सकाळी साडे 11 वाजेच्या सुमारास शहर पोलिस व नगरपरिषदेने संयुक्तपणे मोठी कारवाई करीत 6 महिलांना ताब्यात घेत त्यांचे अतिक्रमित शेड व झोपड्यांवर बुलडोझर चालविला.अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसायाबाबत वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या चेतावणी व सूचनांकडे संबंधितांकडून दुर्लक्ष झाल्यामुळे अखेर कठोर पावले उचलण्यात आली.