नेर: कोलूरा गावाजवळ भरधाव ट्रकची जनावरांना धडक
Ner, Yavatmal | Sep 30, 2025 भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जनावरांना चिरडल्याची घटना कोलूरा येथे घडली.एम एच 34 बीजी 5077 या क्रमांकाचा ट्रक राख घेऊन वेगाने जात होता. यादरम्यान कोलूरा येथील सुरेश मासाळ यांचे जनावरे रस्त्याच्या कडेला उभी होती.यावेळी ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून उभी असलेल्या जनावरांना ट्रकने चिरडत नेले. यामध्ये एक म्हैस दगावली असून दोन म्हशी व एक गाय गंभीर जखमी झाली आहे.ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला आहे.या घटनेची माहिती नेर पोलिसांना...