दिवाळीच्या शुभ पर्वानिमित्त आज खासदार प्रफुल भाई पटेल यांची गोंदिया येथील रामनगर निवासस्थानी गोंदियाचे आमदार श्री. विनोद अग्रवाल यांनी सदिच्छा भेट देऊन दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सदिच्छा भेट घेत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. या प्रसंगी विविध विषयांवर आत्मीय संवाद साधत सर्वांना आनंद, समाधान आणि समृद्धीने भरलेल्या दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा खासदार प्रफुल भाई पटेल यांनी दिल्या.