चिखली: मेरा खुर्द येथे तरुणाला जीवे मारण्याची धमकी,तिघांविरोधात अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे जुन्या वादातून एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरोधात अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुरुषोत्तम संतोष काळे (वय 23, रा. मेरा खुर्द) यांनी तक्रार दिली आहे.