रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत दिनदयाल वार्डात आरोपी मनोज बिसेन वय 59 वर्ष हा सट्टापट्टी घेत असताना पोलिसांनी धाड घालून त्याला रंगेहात पकडले. सदर कारवाई दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी गुरुवारला साडेसहा वाजेच्या दरम्यान करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, आकडे लिहिलेली चिठ्ठी, आणि पेन असा माल जप्त केला आहे. आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.