स्थापनेपासून देवेंद्र फडणवीस सरकारने जनहिताचे निर्णय घेतले. यावेळी सुद्धा वीज पंपाचे बिल माफ, नव्याने ले-आऊट मधील प्लॉटला कायदेशीर मान्यता, अतिक्रमण धारकाला पट्टेवाटप याशिवाय पवनी नदीकिनाऱ्यावर सुरक्षा भिंतीचे बांधकाम, स्वच्छ पाणीपुरवठा, अशा विविध विकास कामासाठी अध्यक्षपदाच्या उमेदवार भावनाताई भाजीपाले व २० नगरसेवकांना निवडून द्या, तरच पवनीच्या विकासाची लक्ष्मी कमळावर बसेल असे प्रतिपादन निवडणूक प्रचार सभेत बोलताना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 24 नोव्हेंबर रोजी केले.