धुळे: पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंचा कारवाईचा बडगा; देवपूरमध्ये दहशत माजवणारी 'चित्ते' टोळी जिल्ह्यातून तडीपार!
Dhule, Dhule | Nov 11, 2025 धुळेतील देवपूर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ‘चित्ते’ टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल आणि विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत राजेश, रामेश्वर, गोविंद, साहिल आणि तरुणकुमार चित्ते या पाच जणांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या कारवाईने गुन्हेगारीला आळा बसला आहे.