खुलताबाद: कोहिनूर कॉलेजमधील व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांमधील वाद शिगेला, सचिवांनी चक्क मुख्य गेटला ठोकले कुलूप
खुलताबादमधील कोहिनूर कॉलेजमध्ये प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद वाढला आहे. निलंबित प्राचार्य आणि काही प्राध्यापक महाविद्यालयात बेकायदेशीर प्रवेश करत असल्याच्या आरोपावर सचिव आसमा खान यांनी मुख्य गेटला कुलूप ठोकले. संस्थेचा आरोप आहे की प्राचार्य आणि काही प्राध्यापकांनी नियमांचे उल्लंघन, आर्थिक गैरव्यवहार आणि खोटे कागदपत्रे सादर केली. कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की प्रशासन मनमानी करत आहे.आसमा खान यांनी सांगितले की निलंबित प्राध्यापकांना प्रवेश दिला जाणार नाही असे स्पष्ट केले.