खुलताबाद: एकतेच्या धावेत खुलताबाद दुमदुमलं; तहसीलदार कंकाळ यांच्या हस्ते पोलिस स्टेशनतर्फे ‘रन फॉर युनिटी’ला हिरवी झेंडी
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज (दि. 31 ऑक्टोबर) सकाळी आठ वाजता पोलिस स्टेशन खुलताबादतर्फे ‘रन फॉर युनिटी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून म्हैसमाळ रोडपर्यंत दोन किलोमीटर अंतर धावणे व चालण्याचा उपक्रम पार पडला. तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला प्रारंभ झाला.