जालना: जालना तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याकडून पाहणी
Jalna, Jalna | Sep 22, 2025 जालना तालुक्यात सोमवार दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री 3 वाजेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सेवली मंडळात सुमारे 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे उखळी येथील पाझर तलाव फुटल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सोमवार दि. 22 सप्टेंबर 2025 रेाजी सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत विरेगाव, सेवली व नेर मंडळातील बाधित भागांची पाहणी करून शेतकरी आणि नागरिकांची व्यथा जाणून घेतली.