राहाता: पराभव झाला तरी चालेल पण एकनिष्ठ व्यक्तीलाच नगरपालिकेची उमेदवारी : डॉ.सुजय विखेंची रोखठोक भूमिका
शिर्डी नगरपरिषद निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रकियेस सुरुवात झाली आहे. महायुतीकडून कोणाला उमेदवारी जाहीर होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे आयोजित मेळाव्यात सुजय विखे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निष्ठावंत व्यक्तीलाच उमेदवारी जाहीर केली जाईल असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.