नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील येणस शेत शिवारातून विहिरीतील इकोझोन कंपनीची मोटर व 150 फूट केबल चोरीला गेल्याची घटना 21 डिसेंबरला उघडकीस आली आहे. याबाबतीत किरण मनोहर चौधरी यांनी 22 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून 26 मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे अशी माहिती आज २३ डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता पोलिसांनी दिली आहे.