अमळनेर: दरेगाव येथे विषारी औषध सेवन केल्याने परप्रांतीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू; मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
अमळनेर तालुक्यातील दरेगाव येथे परप्रांतीय तरुणाने विषारी औषध सेवन केल्याने उपचारादरम्यान धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यासंदर्भात रविवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कुबडिया सूरसिंग बारिया वय ३५, रा. खरगोन, मध्यप्रदेश ह.मु.दरेगाव ता. अमळनेर असे मुळे झालेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.