नागपूरच्या दौलतवाडी भागात रात्रीच्या सुमारास एका घरात साप निघाल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, प्रसिद्ध वाईल्डलाईफ रेस्क्यूअर शुभम जी.आर. यांनी वेळीच धावून येत या सापाला सुरक्षितरीत्या पकडून जीवदान दिले.मिश्रा यांच्या बेसिनच्या पाईपमध्ये काहीतरी हालचाल जाणवली. काही क्षणातच घराच्या दरवाजाशेजारी असलेल्या गादीतून एक साप बाहेर आल्याने घरातील सदस्यांची भंबेरी उडाली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.