रोहा: रोहा येथील मनोली मनोज गुरव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला मागे
Roha, Raigad | Nov 26, 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेत, सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. रोहा येथील मनोली मनोज गुरव यांनी पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. याबद्दल आज बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारकार्याला त्यांचे सहकार्य निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल. मनोली गुरव यांना त्यांच्या प्रभागातील सर्व विकासकामांसाठी आवश्यक ते सहकार्य वेळोवेळी करण्यात येईल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक विचारधारेच्या प्रसारासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात त्यांची साथ अत्यंत मोलाची ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो.