करवीर: भाविकांच्या निर्विघ्न दर्शनासाठी प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी अमोल येडगे
भाविकांचे दर्शन सुलभ होईल त्या अनुषंगाने सर्व व्यवस्था देवस्थान समिती, महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेले आहेत. जिल्हा प्रशासन आणि अंबाबाईचा नवरात्र महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने आणि देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेला आहे. भाविकांच्या निर्विघ्न दर्शनासाठी दर्शन रांगा, ऊन आणि पावसापासून बचावासाठी ची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.