आज आज दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कवलेवाडा येथे दंडार, शायरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती चित्रकला चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती राजकुमार यादव , सामाजिक कार्यकर्ते योगेश चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दंडार, शायरी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि त्यामुळे दंडार शायरी पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी यावेळी पाहायला मिळाली.