भडगाव: वरची पेठ भागातील हनुमान मंदिरात नारळ वाढवून सुशीला बाई पवार प्रभाग एक मधून अपक्ष लढण्यावर ठाम, सुरू केला प्रचार,
भडगांव नगरपरिषदेची रणधुमाळी सुरु झाली असून आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता भडगाव शहरातील खालची पेठ व वरची पेठ भागात प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवार रवींद्र भगवान पवार यांच्या आईसाहेब सुशीला बाई भगवान पवार यांनी ढोल ताशांच्या गजरात वरची पेठ भागातील हनुमान मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा उत्साहात श्रीगणेशा केला, यावेळी त्यांचे प्रचारार्थ पेठ भागातील सामान्य नागरिक, महिला भगिनी, जेष्ठ नागरिक, हितचिंतक व पेठ भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.