जुन्नर: जुन्नर येथील पंचलिंग वस्ती येथे मद्यधुंद युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
Junnar, Pune | Nov 26, 2025 शहरातील पंचलिंग वस्तीमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकाने आईला धक्काबुकी करून स्वतःच्या हातावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (ता.२५) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या मद्यपी युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आकाश संजय कोळेकर (वय २०) असे या युवकाचे नाव आहे.