गोंदिया: गोंदिया येथील ब्राह्मणकर हॉस्पिटलला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दिली भेट
ब्राह्मणकर हॉस्पिटलला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.नोव्हिल ब्राह्मणकर यांची भेट घेतली.तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.ब्राह्मणकर हॉस्पिटल हे केवळ एक आरोग्यसेवा केंद्र नसून समाजासाठी आशेचा किरण ठरले आहे. डॉ. नोव्हिल ब्राह्मणकर आणि निलेश चुटे यांच्या अखंड प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी कमी खर्चात तसेच निःशुल्क सर्जरीची सुविधा उपलब्ध झाली आहे.