सेनगाव: पंचायत समिती कार्यालयाला संविधान दिनाचा विसर, प्रहार व क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
सेनगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात न आल्याने आज प्रहार जनशक्ती पक्ष व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवून ठिय्या आंदोलन केले.मात्र या आंदोलनानंतर उशिरा पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे,संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.