शिरपूर: सर्वोच्च न्यायालयातील घटनेचा निषेधार्थ तहसील कार्यालयात बौद्ध- आंबेडकरी समाजाकडून निवेदन
Shirpur, Dhule | Oct 11, 2025 सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या दिशेने एका धर्मांध वकिलाने जोडा फेकण्याचा प्रयत्न करून भारतीय न्यायव्यवस्थेचा,तसेच संविधानिक मूल्यांचा अपमान केला आहे.या अमानुष व मनुवादी कृत्याच्या निषेधार्थ समस्त शिरपूर तालुक्यातील बौद्ध-आंबेडकरी तसेच शिव-शाहू-फुले- आंबेडकरी चळवळीच्या वतीने 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी साडे 11 वाजेच्या सुमारास शिरपूर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.सदर निवेदन तहसीलदार महेंद्र माळी यांच्या वतीने महसूल क्लार्क कैलास कंखरे यांनी स्वीकारले..