चंद्रपूर: बोथली येथील इसमाची आत्महत्या
खडसंगीजवळील बोथली (वा) येथील रहिवासी मनोहर बुधा पाटील (४५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ऑक्टोबरला सकाळी उघडकीस आली. मनोहर यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने ते घरात एकटेच होते. दरम्यान मनोहरच्या गळ्याजवळ असलेल्या गाठीमुळे ते त्रस्त होते. त्यामुळे या आजाराला कंटाळून मनोहर बुधा पाटील यांनी स्वतःच्या घरीच आत्महत्या केली. सदर घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर शेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात आणला.