गोंदिया: बिरसोला काठी येथे घराचे कुलूप तोडून लाखोंचा मुद्देमाल चोरी, रावणवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Gondiya, Gondia | Jun 19, 2025 दि.11ते18 जूनच्या 5 ते 10 वाजेच्या दरम्यान बिरसोला काठी येथे कोणीतरी अज्ञात चोराने घराच्या दरवाजाचा कुलूपकोंडा तोडून घरात प्रवेश करून बेडरूममध्ये ठेवलेल्या लोखंडी अलमारीतून 1 सोन्याचे नेकलेस किं.60 हजार,2 जोड सोन्याची कानातील झुमके किं.24 हजार,3 सोन्याचे अंगठी किं.30 हजार,1 सोन्याची नथ किं.12 हजार,3 जोड चांदीचे पायल किंमत 8 हजार नगदी 10 हजार एकूण सोन्या चांदीची दागिने व नगदी1लाख 44 हजार रु.माल कुणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले