उरण: न्हावा शेवा डिस्ट्रीब्युशन टर्मिनल येथे जेएनपीएतर्फे इलेक्ट्रिक व्हेईकल ट्रक्स ताफ्याच्या फ्लॅगिंग ऑफ सेरेमेनिचे आयोजन
Uran, Raigad | Sep 25, 2025 आज गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास आमदार महेश बालदी यांच्या उरण मतदारसंघातील न्हावा शेवा डिस्ट्रीब्युशन टर्मिनल येथे जेएनपीए तर्फे नव्या इलेक्ट्रिक व्हेईकल ट्रक्स ताफ्याच्या फ्लॅगिंग ऑफ सेरेमेनिचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच आर. लक्ष्मणन, आयएएस, संयुक्त सचिव, एमओपीएसडब्ल्यू उमेश शरद वाघ उपस्थितीत होते.