चारठाणा या गावातील रहिवाशी टीना सुनील जमरे वय २० ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली की माझ्या पोटात दुखत आहे मी कुऱ्हा येथे सरकारी दवाखान्यात जाऊन येते. असे सांगून घरून निघालेली तरुणी नंतर घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.