परळी: मनसेच्या वतीने परळी मतदार संघात अभिजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर
Parli, Beed | Oct 25, 2024 महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे परळी वैजनाथ मतदार संघात एन. के. देशमुख यांचे पुतणे उच्चविद्याविभूषित तसेच महत्वाकांक्षी उद्योजक असलेल्या अभिजित दादा देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या उमेदवार यादीत मतदारसंघ क्र. २३३ परळी वैजनाथ येथे अभिजित दादांची उमेदवारी जाहीर होताच मनसैनिकांत उत्साह संचारला आहे. याबाबत बोलताना मायबाप जनता आणि राज ठाकरे साहेबांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मनसैनिकांच्या सहाय्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असे प्रतिपादन अभिजि