देवळी: मजुरीच्या कामावरून वाद: इंदिरानगर येथे कुऱ्हाडीच्या घावाने एका व्यक्तीचे डोके फुटले;आरोपी विरोधात देवळीत गुन्हा दाखल
Deoli, Wardha | Oct 19, 2025 देवळी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या देवळी शहरातील इंदिरानगर येथे एका किरकोळ वादातून एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याची घटना १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली असून 19 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे याप्रकरणी फिर्यादी अनिल वानखेडे रा.इंदिरानगर, यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, किशोर उर्फ बापूराव तुळशीरामजी मरगडे, रा. इंदिरानगर, देवळी या आरोपीविरोधात देवळी पोलीस स्टेशनमध्ये दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.