परभणी: मंदिरात स्कुटी वरून जाणाऱ्या महिलेची पर्स पळवली लक्ष्मी नगरातील घटना
स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी स्कुटी वरून जात असलेल्या महिले जवळील पर्स दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखीनी पळवल्याची घटना 27 ऑक्टोबरला सायंकाळी सहाच्या सुमारास पारदेश्वर मंदिर लक्ष्मी नगर येथे घडली. याप्रकरणी 28 ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.