अंजनगाव सुर्जी येथील मजीप्रा (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) कार्यालयात सुरू असलेल्या व्हॉल दुरुस्ती कामादरम्यान आज दुपारी २ वाजता अचानक व्हॉल निसटल्याने मोठा प्रकार घडला.तब्बल २५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीतून जोरदार प्रवाह सुटून लाखो लिटर पाणी वाया गेले,यामुळे मजीप्रा यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.एकीकडे शहरात दररोज दूषित,दुर्गंधीयुक्त व मातीमिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे प्रकृतीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.