करवीर: आमदार अशोकराव माने यांच्या विरोधात कोल्हापुरी क्लस्टर व्यावसायिक आंदोलनाच्या तयारीत- क्लस्टरचे अध्यक्ष अशोक गायकवाड
आमदार अशोकराव माने यांच्याविरोधात मराठा समाजानंतर कोल्हापुरी क्लस्टर व्यावसायिक आक्रमक झालेत.विश्व पंढरीसमोर असणाऱ्या जागेवर कोल्हापुरी क्लस्टर व्यावसायिकांनी आपला दावा सांगितला आहे.मात्र आमदार झाल्यानंतर अशोकराव माने यांनी महिला उद्योग समूहासाठी विश्व पंढरी समोरील जागा घेतल्याने आता कोल्हापुरी चप्पल क्लस्टर व्यावसायिकांनी आमदार माने यांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे,अशी माहिती कोल्हापुरी चप्पल क्लस्टरचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली आहे.