उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीची २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरुवात करण्यात आली एकूण वीस फेऱ्यांची मतमोजणी सहा टेबलावर घेण्यात आली, प्रत्येक फेऱ्यांचे निकाल घोषित होताच मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचा जल्लोष पहायला मिळाला, गुलालाची उधळण करीत विजयी झालेल्या उमेदवारांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला,व मतदान केंद्रावरून प्रत्येक विजयी उमेदवारांनी विजयी रॅली काढली