राज्याच्या नंदुरबार येथे संपन्न 22 व्या महाराष्ट्र राज्य महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रामटेकचा ताई गोळवलकर महाविद्यालयाच्या महिला क्रिकेट चमूने अजिंक्यपद प्राप्त केले आहे.यानंतर बुधवार दिनांक 10 डिसेंबरला रात्री नऊ वाजता च्या दरम्यान त्यांचे रामटेक येथे आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यापूर्वी नागपूर रेल्वे स्टेशन येथे सुद्धा जल्लोषात स्वागत करण्यात आले.या स्पर्धेत एकूण 20 संघांनी भाग घेतला होता.