किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत होऊन एका महिलेच्या डोक्यावर गंभीर प्रहार केल्याची खळबळजनक घटना अड्याळ येथील शहर वार्ड क्रमांक ०४ मध्ये घडली आहे. १३ जानेवारीच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास रंजना रतन तिरपुडे (६०) या जेवण करून घरी जात असताना, त्यांना आपल्या नातीच्या रडण्याचा आवाज आरोपींच्या घरातून आला. रंजना तिरपुडे तिथे विचारपूस करण्यासाठी गेल्या असता, आरोपी ज्योती राजू भोवते ही फिर्यादीची मुलगी प्रीती हिला केस धरून बेदम मारहाण करत असल्याचे दिसले.