जालना शहरात पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे मोटारसायकल चालकांना गंभीर दुखापत होणे, त्यातून होणारे अपघाती मृत्यू तसेच पक्ष्यांना होणारी हानी टाळण्यासाठी जालना पोलीस दलाकडून सातत्याने जनजागृती व कठोर कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवार दि. 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व वापर याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्यांना दिले आहेत.