धुळे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून आयुक्त नितीन कापडणीस यांनी विविध प्रस्तावित ठिकाणांची पाहणी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीतील शासकीय गोदामाचा मतमोजणी कक्ष व स्ट्रॉंग रूमसाठी आढावा घेतला. तसेच जुनी मनपा इमारत, नवरंग-रामनगर जलकुंभ परिसर, मनपा शाळा क्रमांक २९ व ५ आणि मनोहर चित्रमंदिर येथे निर्णय अधिकारी कार्यालयांसाठी सुविधा तपासल्या. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, अग्निसुरक्षा व विद्युत व्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश दिले.