शेडेपार व सालई या दोन गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या नाल्यावरील पुलाला भगदाड पडले असून रस्ता खचल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याची स्थानिकासह प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी तसेच शेतकरी वर्गाकडून केली जात आहे सविस्तर असे की देवरी तालुक्यातील शेडेपार तसेच सालई हे दोन्ही गावे जोडणाऱ्या रस्त्यावरून स्थानिक शेतकऱ्यांकडून प्रवास करण्याकरिता पहिली पसंती दिली जाते याच रस्त्याने दोन्ही गावातील शेतकरी शेतातील कच्च्या तसेच पक्का माल ने आण करी