नवी दिल्ली येथील बिकानेर हाऊसमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या प्रतिष्ठित '८ व्या टॉफ्ट (TOFT) टायगर वाइल्डलाईफ टुरिझम अवॉर्ड्स २०२५' सोहळ्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने (TATR) राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. ताडोबातील मोहरली (कोअर) गेट येथे कार्यरत असलेल्या निसर्ग मार्गदर्शक (Nature Guide) श्रीमती शाहनाज सुलेमान बेग यांना 'बिली अर्जन सिंग मेमोरियल अवॉर्ड फॉर बेस्ट वाइल्डलाईफ गाईड ऑफ द इयर (पश्चिम भारत)' या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.