दि. 8 नोव्हेंबरच्या 5 ते 6 वाजेच्या दरम्यान मौजा सुखदेवटोली समोर सिमेंट रोडच्या बाजूला यातील आरोपी मृतक बिसन रहेकवार याने आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एमएच 35 ए.वाय. 8121 टीव्हीएस कंपनीची लुना हे वाहन भरधाव वेगात व हयगयीने व लापरवाईने चालवून रोडच्या बाजूला उभा असलेल्या अज्ञात वाहनाला धडक मारून स्वतः गंभीर जखमी होऊन स्वतःच्या मरणास कारणीभूत झाल्याने फिर्यादी मनोज बर्वे यांच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलीसात दि. 8 नोव्हेंबर रोजी 11:45 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.