कुही: अती पावसाने बोथली येथे घर पडून अंदाजे 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान
Kuhi, Nagpur | Sep 27, 2025 ग्रामीण भागात असलेल्या मौजा बोथली येथे अती पावसामुळे घर पडून अंदाजे 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 27 सप्टेंबर शनिवारला दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली . याबाबत चे वृत्त असे की बोथली येथील रहिवासी वसंता राघोजी तितरमारे यांचे घर असून काल रात्री पासून पाऊस असल्याने तितरमारे यांचे घर पडले. यामध्ये अंदाजे 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले सदर घटनेची माहिती महसूल विभाग व पोलीस स्टेशन येथे देण्यात आली.