जालना शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा अवघ्या काही तासांत शोध लावण्यात यश आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांचा संबंधित कुटुंबीयांकडून गौरव करण्यात आला. सदरील कुटुंबीयांनी बुधवार दि. 17 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजात हा गौरव केला. जालना येथील योहान भागोजी कसबे (वय 27) हा तरुण 9 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास घरातून रागाच्या भरात निघून गेला होता. बराच वेळ शोध घेऊनही तो न सापडल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.