आर्णी: भाजपा तालुका उपाध्यक्ष पदी शिवाजी भालेवाड यांची निवड
Arni, Yavatmal | Sep 16, 2025 तालुक्यातील कवठा बाजार येथील शक्तीकेंद्र प्रमुख भाजपाचे युवा कार्यकर्ता शिवाजी भालेवाड यांच्या कार्याची दखल घेत. तालुकाध्यक्ष रवींद्र राठोड यांनी मंगळवार रोजी भाजपा कार्यालय आर्णी येथून नियुक्ती पत्र देत निवड केली, व पक्ष वाढीकरिता कार्य करण्यास प्रेरित केले. या निवडीचे श्रेय ॲड. श्री. प्रफुल्ल जी चव्हाण जिल्हाध्यक्ष भाजपा, आमदार राजू भाऊ तोडसाम, तालुकाध्यक्ष रवींद्र राठोड व आदिवासी नेते राहुलजी सोयाम यांना दिले.