अकोला: वाहनाच्या धडकेत निलगायीचा मृत्य.. अकोलेतील सावरचोळ परिसरातील घटना
अकोले तालुक्यातील सावरचोळ फाटा परिसरात सोमवारी सायंकाळी ८ वाजल्याच्या सुमारास वाहनाच्या धडकेत एका जंगली प्राण्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार निलगाय अशी ओळख असलेला हा प्राणी अचानक रस्त्यावर आल्याने एका अज्ञात वाहनाची धडक बसली. चालकाने व स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र काही वेळातच सदर प्राण्याचा मृत्यू झाला. वनविभागाने घटनास्थळी येऊन पाहणी केली.