राहुरी: कर्डिले कुटुंबियांच्या दुःखात तनपुरे कुटुंबीय सहभागी:माजी मंत्री प्राजक्त तनपुरे
तीन दशकांचा सामाजिक अनुभव असलेले आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या दुःखात आम्ही तनपुरे कुटुंबीय सहभागी असल्याचे माजी मंञी प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे. आज शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले राजकीय विरोधक आमदार कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.