रामटेक: शहरात धम्मचक्र दिन उत्साहात साजरा; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन
Ramtek, Nagpur | Oct 14, 2025 धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्य मंगळवार दिनांक 14 ऑक्टोंबर ला सकाळी दहा वाजता पासून रामटेक शहरातील डॉ. आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला परिवर्तन मंच रामटेक, स्मारक समिती, बुद्ध विहार समिती पदाधिकारी व सदस्य, विविध पक्षाचे माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते,समाजसेवक, संस्था पदाधिकारी, नागरिक, आंबेडकरवादी अनुयाई यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. मंगळवारी दुपारपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्ल्यार्पण करणाऱ्यांची रीघ लागली होती.