बुलढाणा: सामाजिक न्यायमंत्री यांनी नागरी सत्कार स्वीकारण्या ऐवजी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी!जयश्री शेळके उबाठा प्रवक्त्या
बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.काल रात्री मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूर आला तर शेतातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशावेळी शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे.असे असतांना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन नागरी सत्कार स्विकारत आहेत.त्यांनी नागरी सत्कार स्वीकारण्याऐवजी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी,अशी टीका उबाठा प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली.