अलिबाग: गॅस सिलेंडर मिळेना, नागरिक पुन्हा चुलीकडे वळले
Alibag, Raigad | Mar 30, 2026 रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईचे संकट अधिकच गडद होताना दिसत आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघर अक्षरशः विस्कळीत झाले आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून धूरमुक्त घराचे स्वप्न पाहणाऱ्या गृहिणींना आता नाइलाजास्तव पुन्हा पारंपरिक चुलीकडे वळावे लागत आहे. मात्र, या इंधन टंचाईचा थेट फटका आता जिल्ह्याच्या पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर बसू लागला असून, रायगडमध्ये एक नवा सामाजिक प्रश्न उभा ठाकला आहे.